बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावीच्या परीक्षांबाबत राज्य शासनाचा ‘हा’ मोठा निर्णय 

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बारावीच्या परीक्षा नेमक्या कधी होणार, याबाबत शालेय शिक्षण खातं काय निर्णय घेतं याकडं विद्यार्थी,पालक आणि शिक्षक सर्वांचचं लक्ष लागलं आहे.

‘बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा’, अशी विनंती मी करत असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला आहे. शेवटी परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन

पुण्यात थेट फेसबुकवरून दारूची विक्री; सापळा रचून आरोपीला अटक

आसाम हादरले! 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More