बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावाला अटक झाल्यानंतर शाहरूख खानच्या मुलीने घेतला हा मोठा निर्णय!

मुंबई | शाहरूख खानच्या मुलाला  क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टीत सामील असल्याने आर्यनला अटक करण्यात आली. आर्यनला अटक झाली असल्याचं कळताच शाहरूख खान त्याच्या आगामी पठाण चित्रपटाचे शुटींग सोडून भारतात परतण्याचा निर्णय आहे. आर्यन खानला अटक झाल्यामुळे शाहरूखची बहिण सुहाना खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

सुहाना सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेली पाहायला मिळते. सुहाना आपले अनेक फोटो शेअर करत असते. मात्र तिला आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सुहाना खानने मोठा निर्णय घेतला आहे. सुहानाने आपला कमेंट्स सेक्शन बंद केला आहे. जेणेकरून तिने केलेल्या पोस्टवर कोणीही कमेंट्स करू नये.

या प्रकरणावरुन 4 ऑक्टोबर रोजी आर्यनला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आर्यनच्या बाजूने बोलणारे प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी तब्बल अडीच तासांचा युक्तीवाद घातला होता. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते, त्याच्याकडे बोर्डींग पास देखील नव्हता, त्याला पार्टीसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, त्यामुळे तो फक्त पार्टीसाठी गेला होता, असं सतीश मानशिंदे म्हणाले होते.

दरम्यान, अंमली पदार्थविरोधी पथकाने क्रुझवर टाकलेल्या धाडीत आर्यन खान आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली. आर्यन खानसह 7 आरोपींवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायलयाने आर्यन खानसह 7 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून आजच्या कारवाया करण्यात आल्या’; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

“शाहरूख खानसारखी लोकं इथं कमावतात आणि पाकिस्तानला मदत करतात”

राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील ‘या’ संघाच्या पराभवामुळे होणार मुंबई इंडिअन्सला फायदा!

ह्रतिक रोशनने आर्यनला दिलेल्या पाठिंब्यामुळं कंगना भडकली; म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More