बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं देशभरात थैमान घातलं असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिटनं चिंतेत भर पाडली आहे. ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरिएंटनं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. कारण दिवसागणिक संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेत निर्देश दिले आहेत.

ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. राहिलेल्या लसीकरणाला वेग देण्यासाठी आता ठाकरे सरकारनं निर्देश जारी केले आहेत.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशनाखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ओमिक्राॅनचा वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. लसीकरणाला वेग देण्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाचंही टेंशन वाढलं आहे. ओमिक्राॅननं धोका अधिक वाढला असून आता बूस्टर डोस द्यावा असं म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

”जनरल बिपीन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीच विसरणार नाही”

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात ‘हे’ हेलिकॅाप्टर

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More