बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीन पक्षाच्या सरकारमुळं भाजपला विस्ताराची मोठी संधी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | देशातील महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा काँग्रेसच्या गळतीला सुरवात होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सर्व ताकदीचे लोक भाजपात प्रवेश करत आहेत. तीन पक्षाचं सरकार म्हणजे भाजपला विस्ताराची संधी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी संधी आहे. भाजपच्या विरुद्ध सर्व पक्ष एक झाले, तिथे भाजप विस्तारतोय अशी परिस्थिती सर्व राज्यात दिसून येतीय. भाजप राजकीय स्पेस व्यापून टाकतो. आमच्यासाठी राजकारण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा मार्ग आहे. ओबीसीच्या प्रश्नावर आमच्या 12 आमदारांचा बळी घेतला तरी आम्ही तो प्रश्न लावून धरला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कृपाशंकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे एक विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेमध्ये प्रवेश आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केलं. 370 चा मुद्दा आला आणि कृपाशंकर यांची राष्ट्रभावना जागी झाली, मोदी हे काश्मीर प्रश्नावर कायमचा उपाय करत आहेत, हे त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला तसं पत्र पाठवलं होतं, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला याचा फायदा होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक; जवानांकडून पाच अतिरेक्यांचा खात्मा

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

‘आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी’; भाजपचं थेट खडसेंना आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More