बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल

अहमदनगर | स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकरांनी केलं होतं. त्यानंतर लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं.

आपल्या वकिलांमार्फत इंदोरीकरांनी आपलं उत्तक कळवलं होतं. संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचं अपील मंजूर केलं आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केलं होतं. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला असून हा खटला रद्द करण्यात आला आहे. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं इंदुरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष केला.

या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळी काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. मात्र त्यावेळी व्हायरल झालेली क्लिप कुठली आहे, वेळ, याबाबत कोणताही पुरावा नसल्याने त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केला नव्हता.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भातील पुरावे जमा करत ते जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते.  त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन

‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

‘कोरोनाबाधिताला बेड मिळाला नाही तर…’; मुंबई महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More