बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील लाॅकडाउनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

नंदुरबार | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने सरकारच्या अडचणीतही वाढ होत आहे. गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच तब्बल 25 हजार 833 कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येतंय.

नंदुरबारमध्ये माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला असून सप्टेंबरनंतर आता पहिल्यांदाच महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने लॉकडाऊन करणे हा एक पर्याय समोर दिसत असल्याचं बोलून दाखवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच काही शहरांमध्ये कडक निर्बंध हे लागू करण्यात आलेले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीमही प्रशासनाने हाती घेतली आहे. नुकतेच 45 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी केली होती.

परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. पण आता जो पसरतो तो नवा नवा विषाणू आहे का? याबाबत अद्याप माहिती नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलून दाखवलं. त्याचबरोबर नागरिकांकडून अजूनही सहकार्याची अपेक्षा असल्याची आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”

…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ

एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र

धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More