बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये पहिल्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. पाऊस असताना देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र समोर येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मराठा क्रांती मुक आंदोलनात सामील झाले आहे. ‘ज्या समाजाने लढा दिला नाही, त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली, स्वाभिमानाने लढा देण्याचं शिकवलं. आज मराठा समाजाचे आंदोलन होत आहे. मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा आहे.’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, धनंजय महाडिक,संजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश अबिटकर, चंद्रकात जाधव, ऋतुराज पाटील, विनय कोरे, राजू आवळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. या आंदोलनात या सर्व लोकप्रतिनिधीनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मराठा सरकारला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

गजा मारणेवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारलं

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More