iphone 14 खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी, तब्बल ‘इतक्या’ रूपयांची मिळतेय सूट

नवी दिल्ली | iphone घेणं हे अनेकांच स्वप्न असतं. आता हे स्पप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. कारण सध्या ई-काॅमर्सच्या काही प्लॅटफाॅर्मवर iphone 14 साठी मोठी ऑफर सुरू आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही पैशांची मोठी बचत करू शकता.

सध्या ई-काॅमर्सच्या काही वेबसाईटवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. या सेलनुसार तुम्हाला iphone 14 नेहमीच्या किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीत मिळणार आहे. यामध्ये iphone 14 वर तब्बल 25 हजारांची सूट मिळत आहे.

iphone 14 वर सूट मिळवण्यासाठी तुमच्याकडं खूपच कमी वेळ राहिला आहे. कारण 30 नोव्हेंबरला हे सेल संपणार आहे. त्यामुळं तुमच्याकडं अवघ्या काही तासांचा वेळ उरला आहे.

फ्लिपकार्टवरीलही ब्लॅक फ्रायडे सेलची बुधवारी शेवटची मुदत आहे. त्यामुळं जर 25 हजारांहून अधिक सूट मिळवायची असेल तर तुम्हाला iphon 14 आजच खरेदी करावा लागणार आहे.

iphone 14 सीरीजवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स अशी आहे की, iphone 14 ची नियमीत किंमत 79,900 रूपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ऑफर्सचा लाभ घेतला तर हा फोन तुम्हाला 50 हजार रूपयांमध्ये मिळू शकतो.

सध्या iphone 14 बॅंक ऑफर देखील आहेत. जर तुमच्याकडं HDFC बॅंकेचं क्रेडीट कार्ड असेल तर तुम्हाला पाच हजार रूपयांपर्यंत सूट मिळू शकते. HDFC बॅंकेचं क्रेडीट कार्ड वापरल्यास iphone 14 तुम्हाला 74,900 रूपयांना मिळेल.

महत्वाच्या बातम्या-