बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! घरातून बाहेर पडण्यासाठी पुणेकर देत आहेत ही हास्यास्पद कारणं

पुणे | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत भयावह होत असताना गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून बाहेर पडलेल्या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. त्या दरम्यान पुण्यातील नागरिकांनी दिलेली कारण अत्यंत हास्यास्पद आहेत.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिवसा संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या संचारबंदीतही बाहेर फिरण्यासाठी नागरिक विविध कारणे देऊन पोलिसांच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. एका नागरिकाला पोलिसांनी अडवलं असता त्यांनी मी बँकेत जातोय असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला आठवण करून दिली की, आज रविवार आहे बँक बंद असते, त्यावर या बहाद्दराने पोलिसांना सांगितले की मला बँकेतून मेसेज आलाय, मला पैसे भरायला जायचंय.

पुण्यात नागरिकांकडून अशा प्रकारची हास्यास्पद कारणं ऐकायला मिळत आहेत. पोलिसांकडून अडविल्यानंतर कारवाईच्या भीतीने एका महाशयांनी मी दुकानात दूध परत करायला चाललो आहे हे कारण सांगितलं. आतापर्यंत लोक दूध खरेदी करण्यासाठी जात होते पण ह्या महाभागांनी तर दूध परत करायला जात असल्याचं कारण सांगितलं.

आता सर्वात मजेशीर कारण एका पुणेकर नागरिकाने संचारबंदी काळात पोलिसांनी अडवल्यानंतर दिलं ते म्हणजे मी कबुतरांना खायला घालायला जातोय, पुणेकरांच्या बुद्धिचातुर्य वापरून देत असलेल्या अशा कारणाने पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही हसू अनावर होत आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ हे असं म्हटलं जातं ते उगाच नाही याचा प्रत्यय येताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील नागरिक नियम मोडून परत अशी हास्यास्पद कारणे देत असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांनी घरातच थांबून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More