बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्रास देणाऱ्या सरकारला चांगलाच धडा शिकवा’ म्हणत एसटी कर्मचाऱ्यानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

नाशिक | एसटी कर्मचारी आंदोलनाचा तिढा काही केल्या सुटता सुटेना. या संपात सामिल असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. त्यातच आता नाशिक येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शिवाय आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey), परवहन मंत्री अनिल परब (Transport minister Anil Parab) यांच्यावर रोष व्यक्त केला आहे.

मम्मी- पप्पा मला माफ करा. मी तुम्हाला 35 वर्ष खूप त्रास दिला. पण मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. मुलीलापण सांगा की, मी तिला सॉरी बोललो. मी इथून पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. माझ्या चार पॉलिसी आहेत. पॉलिसीचा नंबर मोबाईलच्या मेसेजमध्ये आहे, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.

याशिवाय त्याने सुसाईड नोटमध्ये राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. प्रशासन आणि परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडमुठेपणामुळे आमचा पगार वाढू शकला नाही. त्यातल्या त्यात कर्ज आणि कमी पगार, तेही नियमित न झाल्याने खूप वैतागलो आहे.

दरम्यान, या कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रशासनाला आणि या सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन केलं आहे. शिवाय त्यानं म्हटलं की, एसटी विलिणीकरण होणार म्हणजे होणारच, असा ठाम विश्वासही व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्यामुळे राज्य सरकारही पेचात पडले आहे. त्यामुळे एसटी संप दिवसागणिक चिघळत चालल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

धक्कादायक! स्वप्नील लोणकर पाठोपाठ आणखी एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More