बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

मुंबई | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हुतात्मा चौकात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूनेला सीबीआयने अटक वाॅरंट पाठवलं आहे. यावरुन सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकार हे मुघलांचं आहे, छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नसून छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मान केला असल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी म्हटलं आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे, म्हणजेच हे मुघलांचं राज्य चाललं आहे, असं देखील सुळे म्हणाल्या.

महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नसल्याचं म्हणत या देशातील महिला अबला आहे, असं त्यांना वाटतं. याच महाराष्ट्रातील मुली मग ती सावित्री असू दे नाही तर अहिल्यादेवी तसेच राणी लक्ष्मीबाई यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं असल्यामुळे सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होतील, कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, अशा घणाघाती शब्दांमध्ये सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या तीन पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापायी…’; राम कदमांचा हल्लाबोल

परतीच्या पावसामुळे धोक्याची घंटा, आज आणि उद्या कोसळणार मुसळधार पाऊस

‘दोन वर्षांपासून महाराष्ट्र बंद करणे हा एकमेव अजेंडा, सुरूवात स्वत: घरी कडीबंद होऊन केली”

“महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?”

धोनीची अफलातून फटकेबाजी पाहून चिमुकल्या चाहत्यांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More