बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन कार घेण्याचा विचार करताय; ‘ही’ कंपनी देतेय दीड लाखापर्यंतचा डिस्काऊंट

नवी दिल्ली | 2021 मध्ये अनेक मोठ्या वाहन कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहेत. कारण प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक सहसा या गाड्यांकडे वळायचे नाहीत. मात्र आता तसं चित्र राहिलेलं नाही. कारण कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसरीकडे ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्या कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर जास्तीत जास्त सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यात ह्युंदाई इंडिया कंपनी आघाडीवर आहे.

ह्युंदाई इंडिया फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. ही सवलत केवळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असेल. या दक्षिण कोरियाई वाहन निर्माता कंपनीने त्यांच्या बीएस 6 कंप्लायंट वाहनांवर बंपर डिस्काऊंट दिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक या कंपनीकडे आकर्षित होत आहे. कंपनीकडून या वाहनांवर दिली जाणारी ऑफर डीलर टू डीलर वेगळी असू शकते. कंपनीने ह्युंदाई सँट्रो ही कार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या लाभांसह लिस्ट केली आहे. या हॅचबॅक कारवर 30,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जाणार आहे.

दरम्यान, इच्छुक ग्राहक निवडक ह्युंदाई कार्सवर 1.5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सँट्रो, ऑरा, ग्रँड i10 निओस, एलेंट्रा आणि कोना या कार्सचा समावेश आहे. ह्युंदाईने कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तब्बल 1.5 लाख रुपयांची सूट दिली आहे. महत्वाचं म्हणजे यात कोणत्याही एक्सचेंज बोनस अथवा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही. विषेष म्हणजे कंपनीने सरकारी कर्मचाऱ्यांना 8000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली आहे.

एलेन्ट्रा या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरिएंट्सवर कंपनीने 1 लाख रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे. ज्यामध्ये 70000 रुपयांचा रोख डिस्काऊंट तर 30000 रुपयांपर्यंतची बोनस ऑफरचा समावेश करण्यात आला आहे. तर ह्युंदाई ऑरा या कारवर कंपनीने 70,000 रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. इच्छुक ग्राहक 50,000 रुपयांपर्यंतच्या रोख डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात. सोबत 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे.

ह्युंदाई ग्रँड i10 नियॉसवरही सवलत देत आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरियंटमध्ये 60,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यामध्ये 45000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच या गाडीवर 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही दिला जात आहे.

थोडक्यात बातम्या

वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा

मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण

संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता

पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

चौकशीला सामोरे जा!; पोहरादेवीच्या दर्शनाआधीच संजय राठोड यांना मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More