बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मुंबई | राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या आकडेवाडीमुळे राज्य सरकारने राज्यात कोरोनाबाबत नवी नियमावली लागू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाग्रस्तांना बेड कमी पडत होते तर कुठे ऑक्सिजनची कमतरता भासत होती. अशाच प्रकारे मुंबईच पुन्हा रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी 80% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत नव्हता. कोविडच्या वाढत्या घटनांमुळे शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी 80% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहे, याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

उर्वरित 20% ऑक्सिजन इतर औद्योगिक कारणांसाठी उपलब्ध असतील असं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे. 30 जूनपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासल होती. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांना आपली जीव गमवावा लागला होता.

दरम्यान, कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असताना आज मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य सुविधा आणि रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचं निदर्शनास आल्याने बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनसारखे कडक निर्बंध लागु करावं, अशा सुचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मनोरंजनाच्या पडद्यावर देखील कोरोनाचं सावट ‘या’ शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण

पैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…

इंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल

…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More