बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे- राज ठाकरे

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रूपये जमा करण्यास सांगितलं असल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारने परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली होती त्यानंतर दोन ते तीन दिवसाच सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हे धक्कादायक आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

या प्रकरणात अनिल देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणीही राज ठाकरेंनीही केली आहे. परमबीर सिंह यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या भेटीनंतर सचिन वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसल्याचं परमबीर सिंह म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी- अमृता फडणवीस

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…

‘अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले होते’; माजी मुंबई पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More