बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेकदा अगदी कमी वेळात वेगवेगळ्या प्रकाराचे व्हिडीओ प्रंचड व्हायरल होतात. कुत्र्याच्या मदतीला गाय धावून आलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडीओमधून माणसांचा क्रुरपणा दिसून येत आहे. एका गाईने कुत्र्याला माणसापासून वाचवल्यामुळे या व्हिडीओची चर्चा सध्या सुरू आहे.

एक व्यक्ती कुत्र्याच्या कानाला धरून ओढताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. तेव्हा कुत्रा मोठमोठ्याने विवळत असताना देखील त्यावेळी तिथे जमलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्या कुत्र्याची दया येत नाही. त्याचवेळी अचानक त्या ठिकाणी एक गाय येते आणि त्या व्यक्तीवर हल्ला करून त्या कुत्र्याची सुटका करते. सुरूवातीला ती गाय त्या व्यक्तीला शिंगावर घेते आणि नंतर त्याला जमिनीवर लोळवते.

त्या व्यक्तीवर जेव्हा गाय हल्ला करते तेव्हा तिथे असलेली महिला त्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी जोर जोरात ओरडते. तरी देखील ती गाय त्या व्यक्तीला शिंगाने उचलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर तो व्यक्ती त्या गाईपासून कसाबसा आपला जीव वाचवून त्याठिकाणांहून पळ काढतो.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याला म्हणतात झटपट निकाल, अशा लोकांच्या बाबतीत असचं झालं पाहिजे, तेव्हाच हे लोक सुधारतील, अशा प्रकाराच्या कमेंट्स देखील लोकांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

‘त्या’ अँथममधून जयदीप राणाचं नाव वगळलं; नवाब मलिकांचा दावा

“वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं”

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’; अमृता फडणवीसांचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More