बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…याला म्हणतात ओळख’; लस घेण्यासाठी अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या संकटानं देशभर खळबळ माजवली आहे. कोरोनाचं संकट आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातोय. सगळ्या नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, असं वारंवार सरकारकडून आवाहन केलं जात आहे. अशातच लसीकरणासाठी लांबच लांब रांगेत उभं राहून नंबर लावावा लागत आहे. सध्या लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लसीकरण करण्यासाठी लोक काय जुगाड, काय युक्ती वापरतील याचा काही नेम नाही. काहीजण ओळखीनंही लस घेत असलेलं पाहायला मिळतं. सध्या व्हायरल होत असलेला या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन भिंतींच्या मध्ये स्पाईडरमॅनप्रमाणे लटकत खिडकीपर्यंत पोहोचतो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे इथे पोहोचताच आरोग्य कर्मचारी खिडकीतून त्याला लसही देतो.

लसीकरणासाठी एकीकडे एवढी भलीमोठी रांग लागलेली असताना दुसरीकडे हा व्यक्ती जुगाड करत लसीकरण करत आहे. सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी केलेलं काम पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

दरम्यान, कोरोना काळात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळत आहे. अशा व्हिडीओजवरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही एकदम भन्नाट येत असल्याचं पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होणाऱ्या या मजेशीर व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

कोरोना महामारीमध्ये जन्मलेल्या बालकांविषयी धक्कादायक माहिती समोर!

…नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल- उद्धव ठाकरे

सबका साथ, सबका विकास, आता ‘सबका प्रयास’ करावा लागणार – नरेंद्र मोदी

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळे मी आज इथवर पोहोचलो- भागवत कराड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More