बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंगालमध्ये भाजपला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा केला होता. सध्याच्या कलांनुसार प्रशांत किशोर यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला होता. तसेच बंगालमध्ये भाजपनं 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरं काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, असं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलं होतं.

आपण भाजपला बंगालमध्ये 100 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचं सांगितलं. मात्र भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला होता.

थोडक्यात बातम्या- 

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

“देशात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More