मुंबई | ज्योतिरादित्य शिंदे यांची आज घरवापसी झाली अशी प्रतिक्रिया त्यांची आत्या यशोधरा शिंदे यांनी दिली आहे. यशोधरा शिंदे या भाजपा नेत्या आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून केली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये कायमच दुर्लक्षित राहिले. त्यामुळे ते भाजपत येत आहेत ही आनंदचीच गोष्ट आहे. मी त्यांचे अभिनंदन करते, असं यशोधरा शिंदे यांनी म्हटलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. हा राजीनामा त्यांनी 9 मार्च रोजीच तयार ठेवला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांच्या आत्या आणि भाजप नेत्या यशोधरा शिंदे यांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या 58 भारतीयांना घेऊन विमान भारतात दाखल
आईचंच काळीज ते….! कोरोनामुळे हवालदिल झालेल्या आईचा काॅल व्हायरल
महत्वाच्या बातम्या–
…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बोलावली महत्त्वपूर्ण बैठक
पुण्यात कोरोनाचा शिरकाव; महापौरांनी नागरिकांसाठी केली ही उपाययोजना
कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक आणखी बाकी आहे- काँग्रेस
Comments are closed.