भाऊंचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहाल तर खळखळून हसाल
मुंबई | मराठी इंड्रस्टीमध्ये विनोदी कलाकार तसेच अनेक चित्रपटांमधून आपल्या कलेची छाप उमटवणारे अभिनेते भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून संपुर्ण महाराष्ट्राला हसवलं आहे. भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाऊंसोबत त्यांचे जोडीदार म्हणजेच कुशल बद्रीके हे देखील लोकांसाठी तितकेच खास कलाकार आहेत. अशातच कुशल बद्रीके यांनी त्यांच्या इन्स्टा खात्यावरुन भाऊंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाऊ कदम स्क्रिप्ट वाचताना झोपलेले पाहायला मिळतात. भाऊंना झोपलेलं पाहुन कुशल त्यांना भाऊ झोपत का नाहीस आरामात?, असं विचारताच नाही रे, पाठांतर करतोय, असं उत्तर देतात आणि भाऊ कदम पुन्हा झोपी जातात.
या संपुर्ण गंमतीचा कुशलने एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कुशलने पोस्टमध्ये भाऊ कदम यांचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा, असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची जोडी नेहमीच सर्वांना खळखळून हसवते. कधी सीआयडीमधले इन्स्पेक्टर बनून, तर कधी सासू-सूना बनून.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे
“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”
“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”
पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.