बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुस्टर डोसबाबत आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस देण्यात येणार आहे. अशातच आता अनेक देशांनी कोरोना विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात लसीकरण हे महत्वाचं शस्त्र असून सध्या सरकारकडून त्यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतात बुस्टर डोस कधी दिला जाईल याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्वाची माहिती दिली आहे. वर्षाअखेरपर्यंत सर्व भारतीयांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार आरोग्य मंत्रालयानं केला आहे.

सध्या प्रत्येक भारतीय नागरिकाला कोरोनाचे दोन्ही डोस देण्यावर सरकारचं लक्ष केंदीत आहे. कोरोनाचे दोन्ही डोस दिल्य़ानंतरही बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू असली तरी भारतात मात्र तसा विचार सध्या तरी सुरू नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण मोहिम राबवली आहे. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

‘या’ ठिकाणी ट्रक चालकांना मिळतो तब्बल 70 लाख पगार!

‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता, कट्टरतावाद कायम राहिला तर…’;, नरेंद्र मोदींनी तालिबानचे सांगितले धोके

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More