बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… तर त्यांचे हात-पाय तोडणार, हा महाराष्ट्र आहे…इथं राज ठाकरेंचं राज चालतं”

मुंबई | चित्रपटात काम देण्याच्या आमिषानं मुलींकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या डायरेक्टरला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला. त्यानंतर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह येत याची माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी अश्लिल कृत्य करणाऱ्यांना थेट इशारा दिलाय.

मुलींसोबत जर कुणी असं करत असेल तर त्यांचे हात-पाय तोडणार आणि तुमच्या प्रदेशात पाठवणार. ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. इकडे राज ठाकरेंचं राज चालतं. सगळ्या भगिनींना आवाहन आहे की, जर कुणी असा प्रयत्न केला तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत, असं मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

अशा प्रकारचं आमिष दाखवून जर कोणी तुम्हाला फसवत असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही आहोत, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. संबंधीत महिलेने संपर्क केल्यानंतर मनसेने त्यांना ट्रॅप केलं. कास्टिंग डायरेक्टर महिलेला फार्महाऊसवर घेऊन आला. त्यांचा मनसे सैनिकांनी पाठलाग केला.

बिरालाल यादव, राहुल यादव, कंचन यादव, जयजेश यादव या चौघांनी महिलेला बोलवलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत चौघांना चांगलाच चोप दिला. तर त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यानी या चौघांना पोलिसांच्या हवाली केलं, अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More