बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

मुंबई | पावसामुळे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने 30 नागरिकांचा बळी घेतला. या दुर्घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेनं सामना अग्रलेखात सर्व दुर्घटना घडल्या त्या केवळ पावसामुळे घडल्या असल्याचं म्हटलंय. यावरून भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘ये मुंबई है ये सब जानती है’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी सामना अग्रलेखाचा 2 मे 2017 या सालाचा म्हणजेच ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळेच्या सामनाच्या बातमीचा फोटो शेअर केला आहे.

त्यामध्ये 2017 मुंबई तुंबली तर मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये मुंबई तुबंली तर पाऊस जबाबदार… असं कसं चालेल?, असा सवालही प्रसाद लाड यांनी राज्य सरकारला केला आहे.

दरम्यान, शनिवारच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबई पावसामुळे काही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून विरोधकांना फटकारलंय. तसेच मुंबईतील डोंगरउतारांवरील वसाहतींमध्ये लाखापेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यातील 200 पेक्षा जास्त लोकांचा दुर्घटनांमध्ये जीव गेला आहे. ही डोंगरउतारावरील घरे काय किंवा जुन्या धोकादायक इमारती काय, मुंबईचा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलंय.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

“लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More