बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ही माझी शेवटची राजकीय लढाई- कॅप्टन अमरिंदर सिंग

नवी दिल्ली | पंजाब काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू  आणि पंजाबचे मावळते मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. आपल्यावर पक्षाने अविश्वास दाखवला म्हणून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. यावरून राज्यात गदारोळ माजला आहे.

पंजाब काॅंग्रेस आणि राष्ट्रीय काॅंग्रेसमधील दिग्गज नेता म्हणून अमरिंदर सिंग यांना ओळखलं जातं. राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये सर्वात पुढे अमरिंदर सिंग यांचं नाव घेतलं जातं. त्याच अमरिंदर सिंग यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ येईल असं खुद्द त्यांना सुद्धा वाटलं नसेल. राजकीय तणावाच्या वातावरणात त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

पंजाब काॅंग्रेसला उभारी देण्यात कॅप्टन यांचा मोठा वाटा आहे. पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले की, ही माझी शेवटची राजकीय लढाई आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील राजकीय वैर सर्व देशाला माहिती आहे. परिणामी आता कॅप्टन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबला आता कोण मुख्यमंत्री भेटतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री करण्यास अमरिंदर सिंग यांनी मोठा विरोध दर्शवला आहे.

थोडक्यात बातम्या 

“मी सांगितलं, राजीनामा देतोय, सोनिया म्हणाल्या, I AM SORRY अमरिंदर”

अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More