मुंबई | कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
हायकोर्टाने राज्य सरकारला अक्षरशः चपराक दिली आहे. हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य’, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सराकरवर चांगला निशाणा साधला आहे.
इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये दिलेली जागा वापरा, असा सल्लाही फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
दरम्यान, कांजूर मेट्रो कारशेडची जमिन जरी क्लीअर असती, तरी कारशेड तिथं नेण चुकीचंच आहे, असा सैनिक समितीचा अहवाल होता. मग तरीही राज्य सरकारचा अट्टहास का?, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”
“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”
उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप
ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”