बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, इथे अधिकारी तुझी…,’ समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावलं

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा सध्या ड्रग्ज प्रकरणी अडचणीत आहे. अशातच 20 ऑक्टोबर रोजी एनसीबीला आर्यन खानची व्हाॅट्सअॅप चॅट हाती लागली. ज्यामध्ये आर्यन खानची ड्रग्जच्या संबंधित संभाषण आहे. हे संभाषण दुसरं कोणी नसून अभिनेत्री अनन्या पांडेसोबत होतं. यानंतर अनन्याची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मात्र यावेळी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अनन्याला फटकारलं.

गुरुवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देखील अनन्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. यावेळी तिला 11 ची वेळ देण्यात आली होती. मात्र ती 2 वाजता एनसीबी ऑफिसला हजर झाली. यावरुन हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, केंद्रीय तपास यंत्रणेचं कार्यालय आहे, असं वानखेडेंनी अनन्याला बजावलं. इथे अधिकारी तुझी वाट बघत बसलेले नाहीत. तुम्हाला ज्यावेळी बोलावलं आहे, त्या वेळेत पोहोचायला हवं, अशा शब्दांमध्ये समीर वानखेडे यांनी अनन्याला फटकारलं.

शुक्रवारी अनन्या तिच्या वडिलांसोबत एनसीबीच्या चौकशीसाठी गेली होती. यावेळी तिची दोन तास चौकशी करण्यात आली. मात्र या चौकशीमधून ठोस पुरावे न मिळाल्यानं आता अनन्याची सोमवारी पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई क्रूझ डग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

कच्च्या तेलाच्या दरात घसरण पण पेट्रोल आणि डिझेलचे दर…

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय, पाहा काय म्हणाला

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More