बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ एक गोष्ट कोरोना संक्रमणामध्ये मृत्यूचा धोका कमी करते, NIMSचा मोठा दावा

नवी दिल्ली | कोरोनाकाळात लोकांना रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्य अधिक ठळकपणे जाणवू लागलं आहे. यामुळे लोक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर अधिक भर देवू लागले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहे.

कोरोनाकाळात व्हिटॅमिन-डीचं मूल्य देखील अधिक ठळकपणे जाणवू लागलं आहे. व्हिटॅमिन डीच्या उच्च पातळीमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची जोखीम कमी होते. तसेच रूग्णांना व्हिटॅमिन-डी दिल्यास मृत्यूदर कमी होऊ शकतो, असंही बोललं जात आहे. निजाम इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने नुकतंच यासंबंधित एक अहवाल प्रकाशित केला आहे.

‘www.nature.com’ वर याबद्दल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. सिकंंदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमधील संक्रमीत रुग्णांवर निजाम इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समधील काही डॉक्टरांनी अभ्यास केला आहे. या अभ्यासानंतर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की, व्हिटॅमिन डी एक संभाव्य इम्युनोमोड्युलेटर आहे जो कोव्हीड-19 च्या उपचारात सहायक म्हणून भूमिका बजावू शकतो.

एनआयएमएसचे ऑर्थोपेडिक तज्ञ आणि लेखक महेश्वर लकी रेड्डी याबद्दल बोलताना म्हणतात की, सीरम व्हिटॅमिन डीचे प्रमाण प्रति नॅनोग्राम 80 ते 100 पर्यंत असते. यामुळे कोव्हिडच्या दाहक चिन्हांना कोणतेही दुष्परिणाम न करता कमी करता येते. निजाम इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने गांधी हॉस्पिलमधील 130 कोव्हीड रुग्णांवर यासंबंधित अभ्यास केला आहे.

थोडक्यात बातम्या-

बाप की हैवान? पत्नीने जेवण न वाढल्याच्या रागात 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या

“मायनसमध्ये जीडीपी, इंधन दरवाढ हे दोनदा निवडून दिल्यामुळे केंद्र सरकारचं रिटर्न गिफ्ट आहे”

रुसून गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न

सुरा घेऊन चोरी करायला आलेल्या 2 चोरांवर भारी पडली एकटी महिला डाॅक्टर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More