बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लसच्या 21 रुग्णांच्या लसीकरणाबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसरा लाटेने हाहाकार माजवला असतानाच हळूहळू ही लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, आता महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे तब्बल 21 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डेल्टा प्लसच्या एका रुग्णाचा महाराष्ट्रात मृत्यूदेखील झाल्याची माहिती समोर आली असतानाच ज्या रुग्णांमध्ये डेटा प्लस हा विषाणू आढळून आला आहे. त्यापैकी एकाही रुग्णाने कोरोनाची लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लसीकरण मोहीम संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी सरकारसह प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे. त्यातच राज्यात आढळलेल्या 21 डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाने कोरोना लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी तीन रुग्ण अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याने लसीकरण झालेलं नाही पण इतर रुग्णांनी लसीकरण करून घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डेटा प्लसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग, पालघर व जळगाव या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आले. त्यापैकी 80 वर्षे एका महिलेचा डेल्टा प्लस या विषाणूने बळी घेतल्याची माहिती समोर आली.

थोडक्यात बातम्या –

प्रेग्नसीनंतर ‘या’ आजारामुळे अनुष्का शर्माने कापले केस

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

आश्चर्यकारक! कोरोना लस घेतल्यानंतर तासाभरात पॅरालिसीस बरा झाला – रुग्णाचा दावा

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More