बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर ही मोठी जबाबदारी, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्ष: थैमान घातलं आहे. कोरोनाची ही लाट अजुन काही ओसरली नाही तर तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आताप्रमाणे आयत्या वेळी धावपळ नको म्हणून राज्य सरकारने खबरदारी म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. अशातच यामध्ये सरकारने फॅमिली डॉक्टरांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना मार्गदर्शन केलं. यावेळी ‘माझा डॉक्टर’ म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच रोखायला मोठी मदत होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणं शक्य होतं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज्याला पुरेशी लस कशी मिळेल यासाठी केंद्राला पत्र जरूर लिहावं”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी उद्यापासून 3 दिवसांची सुट

आयपीएल गाजवलेल्या युवा खेळाडूवर दु:खाचा डोंगर; भावाच्या आत्महत्येनंतर वडिलांचं कोरोनाने निधन

“शिवसेनेसारखं इतरांना जमलं नाही, म्हणून आज अनेक राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत”

मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More