बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

मुंबई | विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस पार पडला. दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या धक्काबुक्कीमुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आणि विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले.

भास्कर जाधव यांच्यासोबत झालेलं वर्तन निंदनीय आहे. राज्यात असा पायंडा पडता कामा नये. असा पायंडा पडायचा नसेल तर सर्वांनी मिळून ठरवायला हवं. मात्र, दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन दिवसांत जनतेला समाधान मिळेल असं काम सरकारनं केलं आहे. त्याबाबत आम्ही विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानतो, तर ज्यांच्याकडून जे घडू नये ते घडलं त्यांना सुधारण्यासाठी मी शुभेच्छा देतो, असा म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला कोपरखळी हाणली. अधिवेशन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधानांच्या योजनेसाठी चुकीची माहिती कशी वापरता? हे सगळं गौडबंगाल आहे. नेमका आमच्याकडून असा कोणता अपराध घडला? आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

थोडक्यात बातम्या- 

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

आज देखील सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा ताजे दर

मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? – रोहिणी खडसे

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधलं सगळ्यांच लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More