बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: “लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पहिल्यांदाच पाहिला”

मुंबई | राज्यातील विधान भवनात हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच आता त्यांच्या अनुपस्थिवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी हल्लाबोल केला आहे.

हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेतण्याचा प्रयत्न करणार आहेत. यातच मुख्यमंत्र्याची अनुपस्थिती म्हणजे विरोधकांनी तर त्यांच्यावर आरोपांची मालिकांच लावली आहे. आता सुधीर मुनगंटीवर यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते पण ते आले नाही. अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरच्या गाडीचा शोध लागला, पण लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पाहिल्यांदाच पाहिला, असं खोचक टोला मुगंटीवर यांनी लगावला आहे.

पुढे मुनगंटीवार यांनी म्हटलं की “मुख्यमंत्र्यांनी अजित पवार किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यायला हवा”. अधिवेशन सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी

Omicron: विनामास्क वाहन चालवणं महागात पडणार; होणार ‘ही’ मोठी कारवाई

हिवाळी अधिवेशन: “…आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?” अजित पवार संतापले

धक्कादायक! कडाक्याच्या थंडीमुळे ‘या’ ठिकाणी 5 जणांचा मृत्यू?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More