बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं खरेदी करायची हीच सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

नवी दिल्ली | सोनं-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हिच योग्य वेळ आहे. सोनं-चांदींच्या दरात घसरण सुरूच असून आजही सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

सोन-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असते.  आज 14 सप्टेंबर रोजी देशांतर्गत (domestically) आणि आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. चांदीचे दर देखील 1.20 टक्क्यांनी घसरले आहेत.

आतंरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ( international market) सोन्याचा भाव 1.43 टक्क्यांनी तर चांदीचा 2.73 टक्क्यांनी खाली आला आहे. सोन्याचे दर 64 रुपयांनी कमी झाले असून आता सोन्याचा दर 50,0074 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर 692 रुपयांनी घसरून 56,799 रुपये प्रति किलो झाला आहे.

दरम्यान, पितृपक्षात (In Pitrupaksa) काही नवीन खरेदी करणं अशुभ मानलं जात. त्यामुळे सोन्या-चांदीची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने दर घसरल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे जाताच मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदींना केला फोन

Relationship: नवीन नात्यात चूकुनही करु नका ‘या’ गोष्टी, येईल कायमचा दुरावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More