बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चौकशीला दांडी मारत नारायण राणे दिल्लीला रवाना; वकिलांनी दिलं ‘हे’ कारण

मुंबई | नारायण राणे या नावाने सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून ते जनआशीर्वाद यात्रेपर्यंत त्यांनी आपल्या वक्तव्यांनी वाद निर्माण केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा परिणाम म्हणून नारायण राणे यांच्यावर राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. पण पोलिसांच्या चौकशीला हजर राहाण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. नारायण राणे हे आपली उर्वरित जनआशीर्वाद यात्रा संपवून पोलीस चौकशीला हजर न रहाता थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी चालू आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दिले होते. मात्र प्रकृती ठीक नसल्याचं कारण सांगत राणेंनी चौकशीला गैरहजर राहत थेट दिल्ली गाठली आहे. पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाड न्यायालयाने जामीन मंजूर करताना अलिबागच्या गुन्हे अन्वेषण विभागात चौकशीला हजर रहाण्याचे आदेश दिले होते. पण नारायण राणे हे हजर न झाल्याने आता कायदेशीर बाबींवर विचार करत असल्याचं अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे हे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यभरात पावसाची संततधार! ‘या’ भागात ढगफूटीसह दरड कोसळली; पाहा व्हिडीओ

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत तब्बल ‘इतक्या’ हजारांची घट; वाचा आकडेवारी

…म्हणून शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या, पाहा व्हिडीओ

यंदाही मिरवणुकीला बंदी; पुण्यात गणेशोत्सवासाठी ‘ही’ नियमावली लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More