Top News राजकारण

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

मुंबई | वर्षभरापूर्वी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराच्या घटनेनंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर काहींनी ‘फ्री काश्मीर’ची मागणी करणारे पोस्टर झळकावले होते. यानंतर पोस्टर हातात असलेल्या महेक मिर्झा प्रभू या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र मंगळवारी मुंबई पोलिसांनी या तरूणीच्या विरोधातील तक्रार मागे घेतलीये. याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात, “वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा”चे फलक होते. त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा.”

तपासादरम्यान, पोलिसांना कोणाताही वाईट हेतू दिसून आला नाही. त्यामुळे महेक हिच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आलाय.

थोडक्यात बातम्या-

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या