बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थायरॉईड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ ज्यूस ठरतील फायदेशीर

मुंबई | धकाधकीचं जीवन आणि बदलती जीवनशैली याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अलिकडच्या काळात थायरॉईडचे प्रमाण वाढले आहे. या आजारात वजन झपाट्याने वाढतं किंवा कमी होतं, जास्त भूक लागते, पोटाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे थायरॉईड झाल्यानंतर जितकं औषधं घेणं गरजेचं आहे तितकंच आहाराकडे अधिक लक्ष देणंही गरजेचं आहे.

आहाराकडे लक्ष देणं म्हणजे नेहमीच बेचव पदार्थांचं सेवन करणं नाही. थायरॉईड नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी ज्यूसचा समावेश करू शकतात. यामुळे आरोग्याला फायदे तर होतीलच शिवाय तुमचा थायरॉईड देखील नियंत्रणात राहिल.

गाजर आणि बीटाचा रस थायरॉईड विरोधात खूप फायदेशीर आहे. गाजर, बीट, अननस, सफरचंद आणि सेलरीचे देठ धूवून त्याचा रस करून पिला तर थायरॉईड नियंत्रणात राहाते आणि शरीरात रक्ताचे प्रमाणही वाढते. तसेच,रिकाम्या पोटी दुधीची रस पिल्याने थायरॉईड नियंत्रणात राहाते आणि हा रस एनर्जी बूस्टर सारखं काम करतो.

दरम्यान, 2 कप जलकुंभीची पाने आणि 2 सफरचंद धूवून त्याचा ज्यूस तयार करून त्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळायचा आणि मग सेवन करायचं. यामुळे थायरॉईड कमी होण्यास सुरूवात होते आणि वजनही झपाट्याने कमी होते. मात्र, घरगुती उपचार किंवा औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं

“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”

‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”

“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More