बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप

कोलकाता । मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. नंदीग्रामला प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. मात्र आता त्यांनी थेट व्हीलचेअरवर बसून प्रचारास सुरवात केली आहे. मात्र उमेदवारी अर्जासोबत दिलेेल्या शपथपत्रात त्यांनी काही गुन्हे लपवल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तृणमूल काॅंगेसच्या कर्ता धर्ता आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केला आहे. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रावर त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला नाही, असं अधिकारी यांनी सांगितलं आहे.

शुवेंदु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये ममता बॅनर्जींवर गुन्हे लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची साक्ष देत ममता बॅनर्जींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 6 गंभीर गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यातील 5 आसाममध्ये आहेत तर 1 सीबीआयच्या हातात आहे. मात्र त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जर एखादा उमेदवार त्याच्याविरोधातील गुन्हे लपवत असेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. या आधारावर ममता यांची उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी; आरोग्यमंत्री कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत!

“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More