बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल’; आनंद महिंद्रांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई | कोरोनानं गेल्या दोन वर्षापासून जगभरात खळबळ माजवली आहे. यात कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर हैराणच करुन टाकलंय. आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्राॅननं (Omicron) तर चिंतेत आणखी भर पाडली आहे. अशातच महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.

आनंद महिंद्र (Anand Mahindra) ते नेहमीच प्रत्येक घडामोडीवर बोलताना दिसतात. त्यांच्या ट्विटमुळे तर ते नेहमीच चर्चेत असतात. यातच आता त्यांचं व्हायरल होणार ट्विट हे कोरोना महामारीबाबत आहे. यामध्ये त्यांनी घाबरून जाणं थांबवण्याची वेळ आली, असल्याचं म्हटलं आहे.

ओमिक्राॅन हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल. हा वेगाने फैलाव होणारा प्रकार आहे, मात्र त्यामुळे आता गंभीर आजार होण्याचा धोका नाही. स्पॅनिश फ्लूच्या बाबतीत देखील हेच झालं होतं, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट पाहिला असेल, तर आतापर्यंत रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भरती होण्याचं प्रमाण दिसायला हवं होतं, पण ते दिसत नाहीये. त्यामुळे कोरोना आता संपणार आहे असं मत आनंद महिंद्रा यांनी मांडलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून किती दिवस माफी मागणार?”

‘लग्नाचं फुटेज द्या, 100 कोटी घ्या’; विकी-कतरिनाला सर्वात मोठी ऑफर

‘जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीतर…’; मोदींनी भाजप खासदारांना भरला दम

‘त्या’ अनाथ मुलाचं पालकत्व शिवसेना स्वीकारणार- किशोरी पेडणेकर

खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More