बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळं देशात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. अशातच भारतात आणखी एक स्वस्त आणि मस्त लस दाखल होणार आहे. ‘कॉर्बेव्हॅक्स’ असं या लशीचं नाव असून हैद्राबादमधील बायोलॉजिकल ई या कंपनीनं ही लस विकसित केली आहे.

TOIच्या वृत्तानुसार, कॉर्बेव्हॅक्सच्या दोन डोसची किंमत 400 रुपयांपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच एका डोसची किंमत केवळ 250 रुपये असेल. बायोलॉजिकल ई च्या मॅनेजिंग डायरेक्टर महिला दतला यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात संकेत दिला आहे. मात्र, या लशीची किंमत ठरणं अजून बाकी आहे.

‘बायोलॉजिकल ई’ची लस ‘कॉर्बेव्हॅक्स’ला मंजुरी मिळाल्यास ती देशात उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त कोरोना लस असू शकते. कोर्बेव्हॅक्स या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिणाम समाधानकारक आले आहेत. केंद्रानं या लशीचे 30 कोटी डोस बुक केले आहेत. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत.

दरम्यान, भारत बायोटेकच्या लशीच्या एका डोसची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये एवढी आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीची किंमत राज्य सरकारसाठी 300 रुपये प्रतिडोस आहे. तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रतिडोस आहे.

थोडक्यात बातम्या – 

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

राष्ट्राध्यक्षांचं ट्वीट डिलीट करणं ट्विटरला पडलं महागात; झाली ‘ही’ कारवाई

धक्कादायक! कोरोनामुळं आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं तीन मुलं झाली अनाथ

‘…म्हणून ‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ झाला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More