Top News पुणे महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे हॉटेलचा परवाना कायमचा होऊ शकतो रद्द!

पुणे | कोरोना विषाणू सर्वत्र पसरत असताना अनलॉक पाचमध्ये 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, बार सुरु करण्यात आले आहेत. हे सुरु असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास हॉटेल मालकाचा परवाना रद्द होऊ शकतो, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

हॉटेल चालकांकडून नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. जर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमचा रद्द होऊ शकतो.

तसेच हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेने सुरु असणार आहेत. प्रवेश करण्याच्या ठिकाणी सानिटाईझरची व्यवस्था, आवश्यक ते सामाजिक अंतर, वारंवार निर्जंतुकीकरण करणे इत्यादी मार्गदर्शक सूचना शासनाने घालून दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींचं ते वक्तव्य बकवास वाटत असेल तर मोदींची आधीची वक्तव्य तपासा”

…तर सामन्याचा निकाल वेगळा असता- महेंद्रसिंग धोनी

चीनला याची मोठी किंमत चुकवावी लागेल- डोनाल्ड ट्रम्प

‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या