बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचं खातं SBI मध्ये असेल तर सावधान; अशाप्रकारे घातला जातोय गंडा!

मुंबई | देशात सध्या सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. ग्राहकांना फोन काॅल, मॅसेज त्याचबरोबर इंटरनेट वेबसाईटद्वारे गंडा घातला जातो. तर काही ठिकाणी ऑफरची लाच देऊन खात्यातले पैसे चोरले जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. भारतातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एसबीआय म्हणजेच स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या खातेदारांना एक बनावट मॅसेज पाठवला जात आहे.

स्टेट बॅकेच्या अनेक खातेदारांना एसबीआयचे क्रेडीट पाॅईटस हस्तांतरीत करून थेट पैसे मिळणार असल्याचा मॅसेज पाठवला जात आहे. या क्रेडीट पाॅईटसच्या बदल्यात 9870 रूपये भेटतील असं आवाहन या मॅसेजमध्ये करण्यात येत आहे. असे मॅसेज बनावट (फिशिंग) असून अशा मॅसेजमधून बॅकेची माहिती चोरी केली जात आहे. ही घटना सायबरपिस फाउंडेशन आणि ऑटोबोट इन्फोसेक प्रा. लिने उघडकीस आणली आहे.

या सायबर गुन्हेगारांनी यासाठी एक एसबीआयची बनावट वेबसाईट देखील तयार केली आहे. या वेबसाईटची नोंदणी एसबीआयकडून केली गेली नसून ती बाहेरील व्यक्तीकडून केली गेली आहे. या वेबसाईटवर बॅकेच्या खातेदारांची माहिती भरण्यास सांगितलं जात आहे. यामध्ये कार्ड नंबर, कार्डची मुदत, सीव्हीव्ही याचबरोबर एम पीन देखील मागितला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत बँकेने खातेदारांना सावध करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, स्टेट बँकेच्या म्हणण्यानूसार, बँक आपल्या ग्राहकांशी कधीही एसएमएस किंवा ई-मेलवरून संभाषण करत नाही. त्यामुळे खातेदारांनी अशा खोट्या मॅसेजपासून सावध राहावे. संबंधित बनावट वेबसाईट माहिती दिल्यानंतर ग्राहकांना ‘थँक्यु पेजवर’ घेऊन जाते. या वेबसाईटचे डोमेन भारतातील तमिळनाडूचे आहे, अशी माहिती सायबरपीसने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना, चक्क पोलिसांचाच सहभाग असल्यानं मोठी खळबळ

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

तो व्यक्ती कोण?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या किस्स्याची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More