अहमदनगर महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ

अहमदनगर | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आदर्श मागणी होत आहे पण, सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव होत आहे. या पद्धतीवर राज्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे.

ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असतील तर त्याबाबत निवडणूक आयोगानं गुन्हे दाखल करावं, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.

ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 30 नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात सर्व्हर जाम झाल्यानं जात पडताळणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या