Top News राजकारण शेती

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार

मुंबई | सध्या संपूर्ण देशभरात कृषी कायद्याचा मुद्दा गाजतोय. याच संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतेय. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.

दरम्यान एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाहीये. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असं स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलंय.

अजित पवार म्हणाले, “देशात शेतकरी आंदोलन करत असून हे आंदोलन चिघळलं आहे. कृषी कायद्याविषयीची बिलं रद्द करावी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या पक्षांचा पाठिंबा आहे.”

आजच्या बैठकीत प्राथमिक स्वरुपाची चर्चा करण्यात येईल. यामध्ये काहीचं म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा. मात्र या विषयावर सगळ्यांशी चर्चा करू. परंतु एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, असंही अजित पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे

‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर

…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय

येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या