बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

औरंगाबाद | अनेकांना घरकूल मिळवून देण्याची राज्य सरकारच्या काही योजना आहे आहेत. जमीन घेण्यासाठी देखील राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. घरकूल योजनेवरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. अनेकांना घर बांधून दिली आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

‘हा नाना पटोले तुमच्यातला आहे आणि तुमच्यातला असल्यामुळे तुमचं दु:ख त्याला जास्त कळतं’, असं नाना पटोले यांनी औरंगाबाद येथे सभेला संबोधित करताना म्हटलं आहे. घर बांधायला आपल्याकडे खूप अडचणी आहेत. जमीन भेटत नाही. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बसून आम्ही एक धोरण केलं आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

आज अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. इथली व्यवस्था वेगळी आहे. शासनाने योजना काढल्यात की 50  हजारांना जागा भेटत असेल तर आम्ही तुम्हाला 50 हजार देतो. परंतु, 50 हजार रूपयांमध्ये जागा भेटत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी गायरान जमिनी नियमामध्ये आणण्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. गायरान जमीनी रेगुलाइज करायच्या, नियमाकुल करायच्या यासाठी एक नियम बनवल्याचं देखीलं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. मी आमच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जमिनी नियमाकुल बनवून दिल्या. तिथं गरिबांची घर बांधून दिली, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांच्या ज्या काही अडचणी असतील तसेच महाज्योतीचे काही प्रश्न असतील हे मी मुंबईला गेल्यावर सगळ्या मंत्र्यांना बोलावून तातडीने त्यावरचा इलाज करतो, असं आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिलं आहे. त्याचप्रमाणे मी शासनाला आणि कलेकक्टरला सांगतो गायरान जमीन नियमाकुल करून द्या, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली”

इंग्लंडचा तारणहार आला! ‘या’ धाकड खेळाडूचं लवकरच संघात पुनरागमन

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More