नवी दिल्ली | कोरोना विषाणूनं जगभरात हातपाय पसरवले आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंही नागिरकांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वेगवेगळया व्हेरियंटनं तर कहरच केलाय. अशातच कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट समोर आला आहे.
कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरियंटची दहशत असताना आता कोरोनाचा NeoCov व्हेरियंट समोर आला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे. वुहान संशोधकांच्या टीमला हा नवा व्हेरियंट नियोकोव सापडला आहे.
या विषाणूमुळे मानवांना धोका आहे की नाही, हे शोधण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये नियोकोव हा नवीन प्रकारचा व्हेरियंट सापडला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नियोकोव (NeoCov) हा नवीन कोरोना व्हायरस कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या अनेक व्हेरियंटनं आतापर्यंत लोकांना धास्तावलं आहे. अल्फा, डेल्टा, ओमिक्राॅन यांसारख्या अनेक व्हेरियंटनं नागरिकांना धास्तावून सोडलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा
“…त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत”
“जनाब संजय राऊत फडणवीसांच्या आरोपांमुळे बावचळले आहेत, त्यांचा झिंग झिंग झिंगाट झालाय”
महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
‘भाजप फ्लॉवर नाही तर फायर आहे’; पुष्पाचा डायलॉग ट्विट करत चित्रा वाघ यांची फटकेबाजी
Comments are closed.