भंडारा | भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या 27 वर्षीय शीतल फाळके यांनी आत्महत्या केल्याने संपुर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
शीतल फाळके मूळ सातारा जिल्ह्यातील परडी येथील राहणाऱ्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी लाखणी येथे तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. अत्यंत हुशार आणि मनमिळावू म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे पवनी येथील अतिरिक्त प्रभारही देण्यात आला होता.
शीतल फाळके आणि त्यांच्या आई लाखणी येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. शीतल यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी रात्री आई सोबत टीव्ही टीव्ही बघीतला आणि दोघीही त्यानंतर झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 च्या सुमारास शीतलच्या आई प्रसाधानगृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना शीतल फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. संबंधीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनेप्रकरणी अर्ज दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर शीतल यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. त्यानंतर पुढील विधींसाठी त्यांचं कुटुंब साताऱ्याला गेलं आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आईच्या मांडीवर डोके ठेवून टीव्ही पाहणाऱ्या शीतल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. मात्र यामध्ये आत्महत्या मागचं कुठलंही कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यात ‘यासाठी कुणालाही दोषी धरू नये. मी माझ्या मनाने आत्महत्या करीत आहे. आई मला माफ कर, तुझी लाडकी’ एवढच लिहलेलं आहे.
थोडक्यात बातम्या –
राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…
विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह
‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण
नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…
‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ
Comments are closed.