मुंबई | राज्यातील पोलिसांना कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना यापुढे वर्दीत राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. वर्दीवर नसताना कोणतीही कारवाई करु नये असं, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी खडसावलं आहे.
हा निर्णय राज्यातील वाहतूक पोलिसांना सुध्दा लागू असणार आहे. वाहतूक पोलिसांना वर्दीवर नसताना कोणत्याही गाड्या अडवता येणार नाहीत. काही वेळा पोलीस वर्दीवर नसताना लोकांवर कारवाई करतात. वर्दीवर नसताना तोतया पोलीस अधिकारी अशावेळी फायदा घेवू शकतात. त्यामुळे वर्दीतच पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची मार्च 2021 मध्ये पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पोलीस दलात चांगले निर्णय घेतले. परमबीर सिंग यांच्या जागी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी विशेष पोलिसांच्या पुर्नरचनेचा पहिला निर्णय घेतला होता.
हेमंत नगराळे हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांच्या सेवेचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यांनी नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी सेवा केली आहे. मार्च 2021 मध्ये परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
‘त्या’ न्यूड फोटोमुळे राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!
राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी
राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ
पुणे श्रमिक पत्रकार संघाचा रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विरोध
‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
Comments are closed.