बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

चंदीगड | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी शिवसेना देखील निवडणुकीला उभं राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतची घोषणा अद्याप तरी शिवसेनेकडून करण्यात आली नाही. मात्र शिवसेनेच्या पंजाबमधील प्रवेशाने काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसत आहे. तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग आता नवीन पक्ष तयार करणार असून भाजपसोबत सर्शत आघाडी करण्याच्या तयारीत आहेत.

नवीन पक्ष निर्मीतीवरुन काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांच्यावर हल्लाबोल करत आह. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरिश रावत यांनी अमरिंदर सिंग यांना धर्मनिरपेक्षतेची आठवण करु दिली.

दरम्यान, भाजपमधून येणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेता, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाता?, असा सवाल अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत काय करता काँग्रेस अनुकूल असेल तेव्हा धर्माच्या आधारे राजकारण करणं योग्य असतं का याला संधीसाधू राजकारण म्हणत नाहीत का?, असे सवाल करत अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More