बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप हा पक्ष जाता-जाता सर्वकाही विकून जाईल”

मुंबई | तृणमुल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जींनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं आहे.जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं आहे. (Mamata Banerjee criticizes BJP)

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं आहे. आपण काय करायला हवं यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून तज्ज्ञांची एक समिती स्थापन करायला हवी असं आमचं म्हणणं होतं. मात्र काँग्रेसने आमच्या मताकडे दुर्लक्ष केलं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तसेच भाजपवर टीका करताना देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागेल. तसेच हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल, असा जोरदार टोला ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे. यावेळी बोलताना काँग्रेस(Congress) आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्या विरोेधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्या विरोधात जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपला पराभूूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल. देशात सुरू असलेल्या फॅसिजमविरोधात सक्षम पर्याय तयार होणं गरजेचं आहे. तसेच यावेळी ममता बॅनर्जींना पत्रकारांनी शरद पवारांनी(Sharad Pawar) युपीएचं नेतृत्व करायला हवं का?, असा प्रश्न केला असता अरे तुम्ही युपीएची भाषा काय करता. आता युपीए नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

“ममता बॅनर्जी जेव्हा सातवीत होत्या तेव्हा शरद पवार…”

“हा घ्या पुरावा, हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण”

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More