IPL 2023 Auction | ‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोची | आयपीएलचा लिलाव (IPL 2023 Auction) केरळमध्ये सुरू झाला आहे. 87 स्लॉटसाठी 10 फ्रँचायझी बोली लावत आहेत. लिलावात 405 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

अपेक्षेप्रमाणे या लिलावात अष्टपैलू खेळाडूंसाठी चुरस पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

सॅम करनला पंजाब किंग्सने 18.5 कोटींना विकत घेतले. यापूर्वी लिलावात क्रिस मॉरिस सर्वात महाग विकला गेला होता. सॅम करनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने बोली लावली. त्यांची आरसीबीशी टक्कर झाली.

6.5 कोटींची बोली लागल्यानंतर आरसीबीने आपलं नाव मागे घेतलं. बोलीने 11 कोटींचा आकडा पार केल्यानंतर मुंबईनेही हात खेचले. दरम्यान पंजाब किंग्जही मधेच आलं पण शेवटी सगळ्यांना मागे टाकत त्यांनी गेम जिंकला.

दरम्यान, 24 वर्षीय सॅम करणने 2019 मध्ये पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. संघाने त्याला 7.2 कोटी रुपयांना खरेदी केलं. त्या मोसमात त्याने हॅट्ट्रिकही घेतली पण त्याला संघाने सोडलं.

2020 च्या लिलावात करणला चेन्नई सुपर किंग्सने 5.5 कोटींमध्ये खरेदी केले होते. दोन वर्षे चेन्नईसोबत राहिल्यानंतर करनने दुखापतीमुळे गेल्या वर्षी झालेल्या लिलावात भाग घेतला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-