बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशील्ड लस घेतलेल्या 11 जणांना झाला हा दुर्मिळ आजार; तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली | ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या 11 जणांना दुर्मिळ आजार झाल्याची माहिती पुढे आली आहे. सीरमनं तयार केलेली लस ब्रिटनमध्ये ऍस्ट्राझेनेका, तर भारतात कोविशील्ड नावानं ओळखली जाते. लस घेतलेल्या 11 जणांना गिलन बार सिंड्रोम हा मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. भारत आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनांतून ही बाब समोर आली आहे.

गिलन बार सिंड्रोम आजार झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करू लागते, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. केरळ आणि नॉटिंगहॅममधील तज्ज्ञांनी अभ्यास केला. याबद्दलचा अहवाल एका नियतकालिकात 10 जूनला प्रसिद्ध झाला.

केरळमध्ये कोविशील्डची लस घेतल्यानंतर सात जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला. या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रातून लस घेतली होती. या लसीकरण केंद्रात आतापर्यंत जवळपास 12 लाख जणांचं लसीकरण झालं आहे.

ब्रिटनमधील नॉटिंगहॅममध्ये चार जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. गिलन बार सिंड्रोम आजार झालेल्या या सगळ्यांनी 10 ते 22 दिवसांपूर्वी कोविशील्डची लस घेतली होती.

थोडक्यात बातम्या- 

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब- जितेंद्र आव्हाड

…हा तर ओबीसींवर घोर अन्याय; आम्ही याविरूध्द न्यायालयात धाव घेणार- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More