बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारल्यापासून राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आलं नाही आणि मराठा समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित रहावं लागलं, असं वक्तव्य प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

50 टक्के आरक्षण मर्यादेच्यावर जाण्याची अपवादात्मक परिस्थिती कशी आहे, याचीही आम्ही कारणमीमांसा केली. त्यासाठी कायदा केला, पण त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर कायद्याच्या बाजूने ठाम भूमिका न्यायालयाला पटवून दिली. त्यामुळे उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा टिकविण्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यश आलं. एवढंच नाही तर मराठा आरक्षण कायद्याची राज्यात अंमलबजावणीही सुरू केली, असंही प्नविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर त्यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या अनेक कारवाया झाल्या होत्या. तेव्हा मात्र कोणताही संबंध सरकारशी जोडला गेला नाही. मग आता या कारवाईचा केंद्रातील भाजप सरकारशी संबंध लावणे योग्य आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More